गाडीची चक्कर मारण्यासाठी गेलेला भामटा गाडी घेऊन पसार झाला.
विक्रीस असलेल्या गाडीची चक्कर मारण्यासाठी गेलेला भामटा तसाच पसार झाला.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मोटारसायकल खरेदी विक्री करणाऱ्या एजंटकडे विक्रीस असलेली मोटारसायकल विकत घ्यायची असे सांगून चक्कर मारण्यासाठी गेलेला भामटा तसाच मोटारसायकल घेऊन पसार झाला. ही घटना दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी राहुरी तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली. या घटने बाबत काल राहुरी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला.
सुनिल डॅनियल शेंडगे, वय ५० वर्षे हे राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे राहत असून त्यांचे राहुरी फॅक्टरी कारखान्याच्या पंपासमोर साई अँटो नावाने गाड्या खरेदी विक्री व सर्व्हिसिग गॅरेज आहे. दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजे दरम्यान सुनिल शेंडगे यांच्या साई अँटो गॅरेज तेथे एक अनोळखी भामटा त्याच्या ताब्यातील ॲक्टिव्हा गाडी क्र. एम एच १६- पी- ९१४७ ही घेवुन आला.
आणि सुनिल शेंडगे यांना म्हणाला की, मोमीन आखाडा येथील असुन मला सेकंड हॅन्ड गाडी घ्यावयाची आहे. तूमच्या कडची मोटारसायकल मला आवडली, मी चक्कर मारून पाहतो. असे सांगून तो भामटा सुनिल शेंडगे यांच्याकडे विक्रीस असलेली बजाज कंपनीची प्लॅटिना गाडी क्र. एम एच १९- सीएन- ८२२१ ही मोटारसायकल चक्कर मारण्यासाठी घेऊन गेला. तो परत न येता तसाच पसार झाला.
सुनिल शेंडगे यांनी थोडा वेळ वाट पाहिली पण तो परत आला नाही. तेव्हा शेंडगे यांनी त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र तो मिळुन आला नाही. तसेच त्या भामट्याची अद्याप पर्यंत वाट पाहिली, पंरतु त्याने गाडी परत आणुन दिली नाही.
त्या भामट्याने गाडी चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर सुनिल डॅनियल शेंडगे यांनी काल राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गून्हा रजि. नं. २५४/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आला.
