३७ वर्षीय महिलेला लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत विनयभंग.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील देसवंडी परिसरातील एका ३७ वर्षीय महिलेला लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांची साडी ओढून पाठीमागुन कवळी मारली. आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. ही घटना तालूक्यातील शिलेगाव येथे घडलीय.
या घटनेतील पिडीत महिला व त्यांची मुलगी या राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे त्यांच्या नातवाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी पिडीत महिला व त्यांच्या मुलीला लाकडी दांड्याने व लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात
आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर एका आरोपीने पिडीत महिलेची साडी ओढून त्यांना पाठीमागुन कवळी मारुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला. घटनेनंतर पिडीत महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी निलेश शरद ढोकणे, आनिता शरद ढोकणे, महेश भारत ढोकणे, भारत आण्णासाहेब ढोकणे, शरद आण्णासाहेब ढोकणे, सर्व रा. शिलेगांव, ता. राहुरी. या पाच जणांवर गून्हा रजि. नं. २४८/२०२४ भादंवि कलम ३५४, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे विनयभंग, मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.
