ऊस व गवत जाळून टाकल्याचा जाब विचारला म्हणून शिवीगाळ, चार जणांवर गून्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेतामधील ऊस व गवत जाळून टाकल्याचा जाब विचारला असता आरोपींनी सदाशिव जाधव यांना शिवीगाळ केली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील कनगर येथे घडली.
सदाशिव रामभाऊ जाधव, वय ७० वर्षे, हे राहुरी तालूक्यातील कनगर येथे कुटुंबासह राहतात. त्यांची कनगर बुद्रुक शिवारात शेतजमीन असुन त्यात ऊसाचे पिक आहे. त्यांच्या शेतीचे शेजारी देवराम पाटीलबा जाधव यांची शेतीजमीन असुन दोघांमध्ये कोर्टात वाद चालु आहे.
या घटनेतील आरोपींनी त्यांचे शेतातली उसाचे पाचरट जाळत असताना सदाशिव जाधव यांच्या ऊसातील एक सरी व बांधावरील गवत खोडसाळपणाने जाळुन नुकसान केले. या बाबत सदाशिव जाधव यांनी आरोपींना विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर सदाशिव रामभाऊ जाधव यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी देवराम पाटीलबा जाधव, सुभाष देवराम जाधव, शरद देवराम जाधव, आदीत्य सुभाष जाधव, सर्व रा. कनगर, ता. राहुरी. यांच्यावर गून्हा रजि. नं. २४६/२०२४ भादंवि कलम ४३५, ५०४ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.
