राज्यात व देशात सुरु असलेले फोडा फोडीचे राजकारण गाव पातळीपर्यंत पोहचले.
राष्ट्रवादीचे पाच सदस्य फुटल्याने ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा, सरपंचपदी सविता बाचकर.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राज्यात व देशात फोडा फोडीचे राजकारण सुरु असताना फोडा फोडीचा वणवा राहुरी तालूक्यातील ग्रामीण भागा पर्यंत पोहल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे पाच सदस्य फुटल्याने राहुरी तालुक्यातील वावरथ ग्रामपंचायत सरपंच निवड प्रक्रियेत सविता आप्पासाहेब बाचकर या सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यामुळे ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकला.
वावरथ ग्रामपंचायतीत आ. शिवाजीराव कर्डिले, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच म्हणून सविता बाचकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती मरकड, कामगार तलाठी हिवाळे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसेवक सानप, पोलीस हवालदार दुधवडे, ग्रामपंचायत सदस्य वसाबाई दुधवडे, शारदा जाधव, कोमल जाधव, भागवत पवार, गणू बाचकर, अण्णासाहेब सोडनर, अविनाश बाचकर, पाटिलबा बाचकर, हारीभाऊ जाधव, गोरख बाचकर, रेवनाथ सोडणर, गोपीनाथ दुधवडे, नारायण दुधवडे, विलास बाचकर, गंगाराम दुधवडे, भिमराज जाधव, बाबासाहेब बाचकर, अशोक बाचकर, राणू बाचकर, अमोल केसकर, दत्तात्रय बाचकर, संजय बाचकर, पंढरीनाथ जाधव, शरद जाधव, सखाराम जाधव आदी उपस्थित होते.
वावरथ ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी ८ सदस्य राष्ट्रवादीचे असल्याने सरपंच म्हणून प्रतिभा ज्ञानदेव बाचकर यांची गेल्या तीन वर्षापूर्वी निवड करण्यात आली होती. पतीराज यांच्यावर इतर सदस्य दोन वर्षांतच नाराज झाले होते. विरोधी भाजप गटाचा १ सदस्य असल्यामुळे सत्ताधारी ८ मधून राष्ट्रवादीचे ५ सदस्य भाजप गटाला येऊन मिळाले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ६ झाले.
तर तनपुरे गटात फक्त ३ सदस्य शिल्लक राहिले. त्यामुळे वावरथ ग्रामपंचायतमध्ये सत्ता स्थापन करण्यात भाजपने यश मिळवले. गावात मागील तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांना कुठल्या प्रकारचा माजी सरपंचाच्या पतीराजाने गावाला विकासाचा हिशोब न देता सदस्य नाराज होऊन आम्हाला विकास हवा आहे. तो विकास फक्त माजी आ. कर्डिले व खा. विखे पाटील यांच्या माध्यमातून गावामध्ये विकास होत असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.
