Type Here to Get Search Results !

आंबेगाव - मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात हॉल्डीग वॉर

 मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात हॉल्डीग वॉर



प्रतिनिधि - अमोल जाधव


देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अनेक इच्छुक उमेदवारांकडून प्रचारास सुरवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या समाजाला जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार असून. सत्ताधारी पक्षाकडून अद्याप उमेदवार जाहीर झाल्या नसला तरी या मतदारसंघात प्रबळ इच्छुक असलेले मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे होल्डिंग झळकताना पाहावायला मिळत आहे.



गेल्या काही महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्या शिवसेना पक्ष फुटून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन भाजप सोबत जाऊन मिळाले व सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली व अजित पवार भाजपला जाऊन मिळाले त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वत्र निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा समजला जाणारा शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली असुन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पक्ष चिन्हासह त्यांचे नावाचे होल्डिंग झळकू लागले आहेत. दरम्यान त्यांचे होल्डिंग झळकू लागल्याने याच मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रबळ इच्छुक असलेले मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचेही होल्डिंगआता झळकू लागले आहे. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात होर्डिंग वार सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. 



दरम्यान मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी अद्याप निश्चित झाली नसती तरी त्यांनी यापूर्वीच मतदारसंघातील गावागावात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले जवळचे संबंध या माध्यमातून त्यांनी विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मतदार संघात उपलब्ध करून दिला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी मिळाली तर आपला विजय सुखकर व्हावा यासाठी आढळराव पाटील यांनीही विविध गाव भेट दौरे, मतदारांशी संपर्क वाढवला असून अनेक ठिकाणी बॅनर, होल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जागा वाटपाचा तिढा पुढील २/३ दिवसांत सुटणार असल्याचे सांगितले असून शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.