प्रतिभा गांधी यांना यंग महिला उदयोजक पुरस्कार देऊन सन्मान
श्रीगोंदा प्रतिनिधी: स्विफ्टनलिफ्ट स्विफ्ट द सोलुशन लिफ्ट द बिझनेस. हे ब्रीद वाक्य असलेले स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया फाउंडेशन पुणे.यांनी नुकतेच महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2024 जाहीर केले असून 3 मार्च 2024 रोजी पुणे येथे पुरस्काराचे अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते देण्यात आला आहे. श्रीगोंदा येथील अरिहंत उद्योग समूह अध्यक्ष सौ प्रतिभा गांधी यांची youngest business woman of the year. या पुरस्कारासाठी निवड केली असून सदर पुरस्कार अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारला आहे. सौ गांधी यांनी मागील 4 वर्षात बिजनेस क्षेत्राचा आलेख हा वाढता आहे त्या सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजसेवा करतांना कोरोना महामरित अनेक गरजू गरीब कुटुंबांना मदत मिळवून दिली व उपचारासाठी निलेश लंके प्रतिष्ठान कडून मदत केली. हे करत असताना स्वतःचा महिलांना सोबत घेऊन उद्योग सुरू केला त्यात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध केला.वेग वेगळं अन्न पदार्थ तयार करून त्याचे मार्केटिंग स्वतः केले. फूड एक्स्पो तसेच कृषी महोत्सवात स्टॉल देऊन. आठवडे बाजार व इतर व्यावसायिकांना माल विक्री करत उद्योग उभा करून यशस्वी केला म्हणुन हा पुरस्कार देण्यात आला आहे.आज पर्यंत त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
