Type Here to Get Search Results !

आंबेगाव - कलाकार मानधन योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा : डॉ.ज्ञानेश्वर थोरात

 कलाकार मानधन योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा : डॉ.ज्ञानेश्वर थोरात



प्रतिनिधी - अमोल जाधव


महाराष्ट्र शासनामार्फत कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, लोक कलावंत, गायक, नाटकार, वादक इत्यादी कलाकारांना महिना २,१००/- रुपयाचे मानधन सुरु करण्यात आले आहे. ज्येष्ठ कलावंतांना आपले जीवनमान जगता यावे तसेच लोककला  जपता यावी; हा या योजनेचा उद्देशा असून गरजू कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा ;असे आवाहनही शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


▪योजनेसाठी लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया


रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पती-पत्नीचा फोटो ,पत्नी नसेल तर स्वतःचा फोटो, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न चाळीस हजार रुपयांच्या आत असावे, कलेचा प्रकार, सन २०१० च्या आतील पंधरा वर्षांपूर्वी पासूनचे कलेचे पुरावे उदाहरणार्थ ,कार्यक्रम पत्रिका, पुरस्कार प्रमाणपत्र, सत्काराचे फोटो, इत्यादी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, यापैकी कोणाचेही शिफारस पत्र चालेल, किमान २०१० सालच्या आतील वारकरी संस्था रजिस्टर असावी, सरकारी लाभ मिळत नसल्याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी कडून सत्यप्रत केलेले प्रतिज्ञापत्र, वयाची अट किमान ५० वर्ष, सर्व कागदपत्राची प्रत्येकी तीन झेरॉक्स व सत्यप्रत असावी. पंचायत समितीमध्ये पंचायत विभाग येथे कागदपत्रांची पूर्तता करून पोच घ्यावी. काही दिवसातच योजना लाभ सुरु होईल.



दरम्यान ही योजना कलाकारांसाठी सुरू केली असून यामुळे कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, लोक कलावंत, गायक, नाटककार आणि वादक इत्यादी मंडळींना मानधन स्वरूपात रक्कम दिली जाते. यातून कलाकार आणि लोककलांचे जतन आणि संवर्धन होईल; यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे कलाकार त्यामध्ये प्रामुख्याने प्रवचनकार, कीर्तनकार, वादक व इतर कलेमध्ये पारंगत असणारी मंडळी खरोखरच त्यांच्या कलेमध्ये पारंगत आहेत का ? मानधनाच्या पोटी सरकारला त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांच्याकडून पूर्ण केल्या जातात का ? हे पाहणे ही गरजेचे आहे. थोडेफार पाठांतर करणे, गायन करणे, एखादा पुरस्कार मिळवणे व मी कलाकार आहे ; असे सांगून अनेक जण वशिल्याद्वारे कागदपत्रांची जुळवाजवळ करून या योजनेचा लाभ घेत आहेत. खरोखर ज्या कलाकारांना या योजनेची मानधनाची गरज आहे ; ते  कलाकार या योजनेपासून वंचित आहेत आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे असे अनेक कलाकार या योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून योजनेचा लाभ घेणारे खरोखरच या योजनेसाठी पात्र आहे का? हे पाहणे गरजेचे आहे.असे मनोगत डाँ ज्ञानेश्वर थोरात यांनी व्यक्त केले