Type Here to Get Search Results !

शिरूर - शिरूर लोकसभेच्या उमेदवारी बाबत उद्योजक देवेंद्र शहा यांनी केला खुलासा

 शिरूर लोकसभेच्या उमेदवारी बाबत उद्योजक देवेंद्र शहा यांनी केला खुलासा



प्रतिनिधि - अमोल जाधव


शिरूर लोकसभा लोकसभेचा तिढा सुटत नसताना एका न्यूज पोर्टल द्वारे शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी वळसे पाटलांचे निकटवर्तीय उद्योग उद्योजक देवेंद्र शहा यांना माहितीची उमेदवारी मिळावी अशी चर्चा मतदारसंघातून होत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती दरम्यान या बातमीचे उद्योजक देवेंद्र शहा यांनी खंडन केले असून मी वळसे पाटील यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असून त्यांच्या माध्यमातून जे काही पद, प्रतिष्ठा मानसन्मान मिळत आहे त्यात मी आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




दरम्यान उद्योजक देवेंद्र शहा यांनी याबाबत खुलासा केला असून त्यानी याबाबत सांगितले की आज एका न्युज पोर्टल वरील बातमी वाचून मला आश्चर्य तसेच खेद वाटून मन व्यथित झाले. मी गेल्या ३५ वर्षींमध्ये माननीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमांतून जे काही थोड फार सामाजिक कार्य केलं आहे ते पूर्णपणे सामाजिक दायित्वांचा भान ठेऊन केलं आहे आणि पुढे हि करत राहणार. ह्या समाजकार्याने मी माझ्या व्यक्तिमत्वातील सामाजिक सज्जता आणि प्रतिबद्धता दर्शवली आहे. परंतु अश्या काही बातम्या मी करत असलेल्या निरपेक्ष कामावर प्रश्नचिन्ह उभ करत आहेत. ह्या बातमीचं मी पूर्ण पणे खंडन करतो. मी माझं कार्य हे एक कार्यकर्ता म्हणूनच करत आहे आणि करत राहीन. अशा बातम्यांमुळे मी निरपेक्ष कामाचा आनंद गमावून बसेन. कृपया ह्या बातमीमुळे कोणीही कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती. माझा व्यवसाय देखील लाखो शेतकरी आणि कामगारांशी निगडित आहे. ह्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो. मला दिलेल्या शरद सहकारी बँकेच्या जबादारीमध्ये सुद्धा एक सामाजिक जाणीव आहे. सहकारी बँकेचा ग्रामीण भागातील स्थर उंचावण्याचा हा एक अविरत प्रत्यत्न आहे. त्या सोबतच अनेक धार्मिक कामांमध्ये हि माझा सहभाग आहे आणि ती कामे बरीच पुढे न्यायची आहेत. आपले सर्वींचे लाडके साहेब माननीय श्री वळसे पाटील यांना समाज आणि राजकारणामधून उच्च मान सन्मान आणि पदं मिळत असतात ; त्यातच आपण सगळे आणि मी व्यक्तिशः आनंदी आहे.


▪प्रसिध्द झालेली बातमी👇


सध्या शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून आघाडीला जोरदारपणे टक्कर देण्यासाठी सर्वसमावेशक सक्षम नेतृत्व म्हणून वळसे पाटलाचा उजवा हात समजले जाणारे उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाला  कार्यकर्ते   पसंती देत असून त्यांना महायुतीची उमेदवारी मिळावी अशी चर्चा मतदारांमधून मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत  आहे.


पुणे जिल्ह्यात येणाऱ्या चार लोकसभा मतदार संघामध्यें शिरूर लोकसभेविषयी जोरदार चर्चा आहे सध्या महाविकासआघाडी कडे  शरद पवार गटाचे उमेदवार सध्याचे खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली  असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीकडे मात्र अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही अशी स्थिती आहे.  त्यात ही जागा कोण लढविणार हाच महत्वाचा प्रश्न आहे 


महायुतीतील शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव येथून निवडणूक लढविण्यास प्रचंड इच्छुक आहेत परंतू ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी अजित पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे यात माजी खासदार आढळराव ही निवडणूक लढविण्यास इतके उतावीळ आहेत की वेळ प्रसंगी  शिंदे सेनेला राम राम ठोकून पक्ष बदलून राष्ट्रवादी अजित पवार गटातही जाण्याची त्यांची तयारी आहे परंतु अशी चर्चा आहे परंतु अजित पवार गटातील अनेक आमदार व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा आढळराव पाटलांना प्रचंड विरोध असल्याचे बोलले जाते.त्यामुळे आयात उमेदवार नको असे अभियान कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले दिसत आहे  म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आढळराव यांना  पक्षात घेण्यासाठी इच्छुक नाहीत असे समजते त्यात अजित पवार गट पूर्वीचे राष्ट्रवादी पक्षांतील परंतु सध्या भाजपात असलेले प्रदीप कंद यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती. परंतु तिलाही पूर्णविराम मिळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा मागील काळात रंगली होती परंतु सध्या तीही मागे पडली आहे. व सद्य स्थितीला पक्षाला उभारी देणारा उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


दरम्यान पक्षाने सक्षम उमेदवार दाखविला नाही तर या जागेवरही शिंदे गट किंवा भाजपा भाजपा आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता नाकारता येत नाही व हि जागा अजित पवार गट सोडण्याच्या तयारीत नाही त्यामूळे या जागेवर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता दाट आहे. व व अजीत पवार यांनी त्यांनाच हिरवा कंदील दाखविला असल्याची चर्चा सुरू झाली आहे . दिलीप वळसे पाटील एक सक्षम पर्याय होऊ शकतील कारण ते या जागेवरुन विजयी झाले तर शिरूर लोकसभेच्या विकासासाठी ते केंद्रात  भरीव काम करू शकतील या बाबत जनतेच्या मनात कोणतेही दुमत नाही वळसे पाटील खासदार झाले तर शिरुर लोकसभा मतदार संघाचा विकास ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतील हा सर्वांनाच विश्वास आहे. परंतु सध्या वळसे पाटलांचे वय पहाता त्यांना  शारीरिक स्थिती पाहता ते लोकसभेसाठी तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे अशा द्विधा स्थितीत पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी वळसे पाटलांच्या तालमीत तयार झालेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेल्या एका सक्षम उमेदवाराविषयी  दबक्या सुरात मतदार संघात चर्चा असून तो उमेदवार म्हणजे वळसे पाटील यांचे अत्यंत  जवळचे कार्यकर्ते शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष व गोवर्धन या सुप्रसिद्ध प्रकल्पाचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शहा होत



 आंबेगावतालुक्यासह खेड जुन्नर शिरूर या भागात देवेंद्र शहा मागील कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे दिसते की आंबेगाव जुन्नर खेड शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी मागील सुमारे पस्तीस वर्षाच्या कालावधीत पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे तसेच चारही तालुक्यातील अनेक शेतकरी, व्यवसायिक  अथवा  कार्यकर्ते हे त्यांच्याशी कोणत्याना कोणत्यातरी कारणाने जोडले गेलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना मदत करणे बे - रोजगारांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, अडचणीत असलेला कोणताही व्यक्ती त्यांचाकडे गेला तर त्याला सर्वोतोपरी मदत त्यांच्याकडून केली जाते अशी आजवर त्यांची ख्याती आहे. करोना महामारी च्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी स्वखर्चाने अन्न छत्रे चालवून अनेक गोरगरिबांना उत्कृष्ट दर्जाचे अन्नदान केले तसेच या परिसरातील गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत शिक्षणासाठी मोठी मदत मिळत असून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे 


जगप्रसिद्ध गोवर्धन दूध प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो शेतकरी त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत दूध क्षेत्रात प्रचंड उत्क्रांती घडवत त्यांनी खेड जुन्नर शिरूर भोसरी आंबेगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱयांना व तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.


 गोवर्धन दूध प्रकल्पावर अनेक छोटे मोठे उद्योग आज कार्यरत आहेत व त्या माध्यमातून अनेक कुटुंबाना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच शरद सहकारी बँकेच्या अध्यक्ष म्हणूनही ते काम करत असून त्यांनी अनेक बेरोजगार युवकांना कर्ज काढून देऊन त्यांना व्यवसायाच्या नवनव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातील अनेक जण यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला हि आलेले आहेत. देवेंद्र शाह हे एक असे रसायन आहे की  खेड जुन्नर आंबेगाव  तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागापासून पुर्व भागातील सर्व गावामध्ये त्यांचेवर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांचा संच देवेंद्र शाह याना त्यांच्या समाजकार्यातून मिळाला आहे. 


शिरूर लोकसभा मतदार संघात    सर्वसामान्य शेतकरी, तरुण, व्यवसायिक उद्योजक याच्या मनात शहा बद्दल प्रचंड  आपुलकीचे भाव आहेत.पुणे जिल्ह्यातील अनेक बहुतांश छोटे मोठे व्यापारी त्यांच्या प्रचारासाठी येऊ शकतील  त्याचप्रमाणे पुणे जिल्यातील भाजपा, राष्ट्रवादी(शरद पवार व अजित पावर गट) काँग्रेस, शिवसेना(ठाकरे व शिंदे गट),मनसे ,रिपाई अशा सर्वच पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यासोबत त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत.त्यामुळे त्यांचाही अंतर्गत पाठिंबा मिळण्याची शक्यता मोठी आहे. त्यातच  ते वळसे पाटलांचे जवळचे स्नेही असून वळसे पाटील शरद पवार यांच्या कामाची पद्धत त्यांना अंगीकृत आहे त्याचप्रमाणे  ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेहि  निकटवर्तीय म्हणून समजले जातात. त्यामुळे देवेंद्र शाह या मतदार संघातून विजयी  झाल्यावर शिरूर लोकसभा मतदार संघाच्या विकासाची पर्वणी सुरू होईल यात शंका नाही


  दरम्यान सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटासाठी हा उमेदवार अमोल कोल्हे यांना चांगली झुंज देऊ शकतो अशी चर्चा मतदारांमध्ये आहे लोकसभेचे वातावरण रंगात येत आहे सर्वच पक्ष लोकसभेच्या महाभारतासाठी रणांगणात उतरत आहेत सत्ताधारी भाजपा तर चारशे पारच्या डरकाळ्या फोडत आहे देश पातळीवर राममंदिर, मणिपूर दंगल, शेतकरी ,एम एस पी आदी मुद्यावर राजकीय वातावरण तापणार हे नक्की परंतु महाराष्ट्रात मात्र राजकीय उलथापालथ झाली आहे म्हणतात ना सख्खा भाऊ पक्का वैरी अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्रात आहे राज्यातील महत्वाच्या दोन पक्षात बंडाळी घडवून विभागणी करण्यात भाजपाला यश आले आहे  येनकेन करून भाजपाला आपला "शत प्रतिशत भाजपा " हा नारा यशस्वी करायचा आहे असे दिसून येते



 त्यामुळे छोटे- छोटे पक्ष फोडून त्यातील महत्वाचे सरदार आपल्या कडे वळविण्यात भाजपा यशस्वी झाला असून कोणी यास   भाजपा चे "नितीहीन" राजकारण म्हणत असेल परंतु भाजपा नेते यास "कृष्ण नीती" या गोंडस नावाने संबोधत  सारवासारव करीत आहेत मात्र हीच कृष्ण नीती  जनतेच्या पचनी पडलेली नसल्याने जनतेत नाराजीचा मोठा सूर आहे त्यात भाजपा ला मित्र पक्षासमवेत 45 चा जादुई आकडा राज्यात मिळवायचा आहे त्यामुळे भाजपा मिरीट वर  निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्र पक्षांना ज्या जागा देणार त्या जागावरही सक्षम उमेदवार मित्र पक्ष कसा ऊभा करील यासाठी भाजपचा हस्तक्षेप दिसतात आहे त्यातच  पुणें जिल्ह्यावर भाजपाचे खुपच सुक्ष्म लक्ष दिसत आहे.




एकंदरीत शिरूर लोकसभेची परिस्थिती पहाता या मतदारसंघात अमोल कोल्हे यांना शह देण्यासाठी देवेंद्र शाह हे जॉईंट किलर ठरू शकतील अशी चर्चा सर्वत्र आहे. याबाबत शहा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे सत्तेच्या सारीपाटात कोणत्या सोंगट्या वापरल्या जाणार असल्याचे चित्र  नजीकच्या आठ दिवसात स्पष्ट होईल यात शंका