पक्ष, पक्षाचे नेते पाठीशी नसताना मी विष्णुकाका हिंगे यांच्या पाठीशी उभा राहिलो - देवदत्त निकम
प्रतिनिधि - अमोल जाधव
मंचर ता. आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या शेतकरी मेळावा प्रसंगी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे पाटील यांनी आपल्या भाषणात देवदत्त निकम यांच्यावर टीका केली होती ज्यांनी जिंकायला शिकवले त्यांच्याशी लढाईची भाषा करू नका.. नियती माफ करणार नाही आपल्याला कोणी काय दिले याची जाण ठेवा एवढी पद देऊनही पाच वर्षे थांबायला सांगितले तर त्यांच्यासाठी त्याग करता आला नाही वळसे पाटलांनी त्यांचे बंधू प्रताप पाटलांना बाजूला ठेवून तुम्हाला चेअरमन केले तुमच्यावर काय अन्याय झाला.. अशी टीका केली होती. याबाबत निकम यांना विचारले असता त्यांनीही विष्णू काका हिंगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत विष्णू हिंगे यांनी दूध संघात कामाला लावणाऱ्यांकडून ३ ते ५ लाखापर्यंत पैसे घेतले योग्य वेळी सर्व यादी दाखवणार, २०१५ साली शरद बँकेने त्यांच्या जमिनीचा लिलाव केला त्यावेळेस गाडीला डिझेल टाकायला पैसे नव्हते मी माझ्या खात्यातून त्यांना पैसे देऊन मदत केली जेव्हा पक्षाचे नेते, पक्ष त्यांच्या पाठीशी नव्हता त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर होतो. माझ्यामुळे ते दूध संघात निवडून आले ज्या माणसाकडे डिझेल टाकायला पैसे नव्हते त्या माणसाची आठ वर्षात एवढी भरभराट कशी झाली एवढी माया कुठून गोळा केली हे सांगावे तसेच योग्य वेळी सगळा समाचार घेणार सोडणार नाही असेही निकम म्हणाले.
▪शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे हेच उमेदवार
शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे हेच उमेदवार असून ते निवडून येण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने एकजुटीने काम करणार असल्याचे निकम यांनी सांगितले.
▪डिंभे धरणातील बोगद्याला आमचा विरोध
डिंभे धरणातून होणाऱ्या बोगद्याला आमचा विरोध असून हा बोगदा झाला तर डावा कालवा बंद पडून आंबेगाव जुन्नर तालुक्यातील २५ गावांना दुष्काळाच्या झळा पोहोचणार असून शेतकरी अडचणीत येणार आहे. आमच्या हक्काचे पाणी आमच्या भागात मिळाले पाहिजे हीच भूमिका आमच्या असून या बोगद्याला आमचा विरोध असल्याचे निकम म्हणाले.

