घोडेगावच्या लोकन्यायालयात ३९३ प्रकरणे निकाली
प्रतिनिधि - अमोल जाधव
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न झाले यावेळी दिवाणी स्वरूपाचे व फौजदारी स्वरूपाचे एकूण ३९३ प्रकरणे निकाली निघाले. तसेच दाखलपूर्व ६९६२ प्रकरणे निकाली निघून एकूण रक्कम २ कोटी ५९ लाख ४७ हजार २०२ रुपयांची वसुली झाली, अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष अँड. प्रमोद काळे यांनी दिली.
पुणे जिल्हा विधी प्राधिकरण सेवा आणि घोडेगाव दिवाणी न्यायालय, असोसिएशन घोडेगाव बार यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश एम. ए. के. शेख, सह दिवाणी न्यायाधीश एम. एस. माळी, एस. एस. मोहिते तसेच घोडेगाव वकील • संघाचे अध्यक्ष अँड. प्रमोद काळे आणि घोडेगाव वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. लोक न्यायालयाचे उद्घाटन घोडेगाव दिवाणी न्यायालयाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश एम. ए. के. शेख यांनी दिप प्रज्वलन करून केले. यावेळी बार असोसिएशनचे जेष्ठ विधिज्ञ अँड. संजय आर्वीकर, अँड. प्रमोद काळे यांनी उपस्थितांना मार्गदशन केले. यावेळी एम.ए.के. शेख यांनी मार्गदर्शन करताना, 'आपापसातील मतभेद दूर करून सांमजस्याने वादावर तोडगा काढून वाद संपवण्याचे आवाहन केले. लोक न्यायालयात पॅनल सदस्य म्हणून अँड. रोहिणी बढे, अँड. आकाश काळे यांनी काम पाहिले.

