Type Here to Get Search Results !

रस्ते व पेव्हर ब्लॉकसाठी ९ कोटींचा निधी आ. नीलेश लंके यांची माहिती

रस्ते व पेव्हर ब्लॉकसाठी ९ कोटींचा निधी

 आ. नीलेश लंके यांची माहिती

 पाणंद रस्ते व महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून निधी

 पारनेर : प्रतिनिधी 

          मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघात रस्ते खडीकरण, सिमेंट काँक्रीट रस्ते तसेच पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी अनुक्रमे ४ कोटी ३२ लाख व ४ कोटी ९० लाख असा एकूण ९ कोटी २२ लाख रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिली. 



▪मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विविध गावांमध्ये होणार रस्त्यांचे खडीकरण : 

रूईछत्रपती तुळजाभवानी मंदिर ते दिवटे वस्ती, नारायणगव्हाण नारायणगव्हाण ते वाडेगव्हाण शिव, माळवाडी ते मुस्लिम वस्ती ते राजेंद्र गोरे वस्ती, अपधूप अपधुप ते सरोवर मळा, अपधूप ते गवळी वस्ती, जातेगांव वेताळवाडी ते घाटवाडी दरा, म्हसोबा झाप हरकळा फाटा ते हरकळा नाला, बन वस्ती ते अचानक वस्ती.

         पळशी डांबरी रस्ता ते काळे वस्ती, दुधवडे वस्ती ते आंबेपान जाधववस्ती, वनकुटे डांबरी रस्ता ते लिंबाहरी वाडा शेराचा ओढा, भोयरे गांगर्डा विठ्ठलवाडी ते बेंद, लोणीहवेली गावठाण ते पाझर तलाव, रूईछत्रपती तुळजाभवानी मंदिर ते दिलीप दिवटे घर, भवानी मंदिर ते बापूराव दिवटे घर, भवानी मंदिर ते  अण्णा दिवटे घर, काकणेवाडी खैरडी ते काळू नदीपर्यंत. 


▪राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध गावांमध्ये मंजुर कामे पुढीलप्रमाणे :

कान्हूरपठार सिध्देश्‍वर महादेव मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक ५ लाख, स्मशानभुमी परिसरात पेव्हींग ब्लॉक ५ लाख, नवलेवाडी रस्ता ते संजय नवले यांच्या शेततळयापर्यंत सिंमेंट रस्ता ५ लाख, संजय नवले शेततळे ते सुभष नवले यांच्या शेतीपर्यंत सिमेंट रस्ता १५ लाख, मांडवेखुर्द बोखाकरला ते आहेर रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, गावठाण ते पांढरी वस्ती रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, म्हसोबा झाप  रंगदास स्वामी मंदीर परिसरात पेव्हींग ब्लॉक १० लाख, गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, कन्हरे दशक्रिया घाट पेव्हींग ब्लॉक १० लाख, पठारवाडी जि प शाळा ते शंकर पठारे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण ५ लाख, जि. प. शाळा ते बोरकर वस्ती रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, जवळा संतोष सालके ते भाना शेळके रस्ता काँक्रीटीकरण ५ लाख, कान्हूर पतसंस्था ते मुक्ता सालके रस्ता काँक्रीटीकरण ५ लाख, कोठावळे रस्ता क्राँक्रीटीकरण ५ लाख, माळवाडी रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख.

शिंगवे नाईक खाकाळ शेत ते धबधबी रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, धबधबी ते कैलास जाधव रस्ता काँक्रीटीकरण १० लाख कैलास जाधव ते धबधबी रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, हिवरे कोरडा स्मशानभुमी रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक १५ लाख, वडगांव दर्या स्मशानभुमी व दशक्रिया घाट पेव्हींग ब्लॉक २० लाख, पिंपरीजलसेन गावठाण ते आबाजीबुवा रोड काँक्रीटीकरण १० लाख, कोकणे शेत ते शेळके मळा रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, काळूबाई मंदिर ते नानाभाऊ काळे रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, लोणीहवेली बारव रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख.

            हिवरे झरे भैरवनाथ मंदिर चौक काँक्रीटीकरण १० लाख, पालखी ओटा येथे पेव्हिंग ब्लॉक १० लाख, विठ्ठल मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक १० लाख, भोयरे गांगर्डा माळवाडी ते विठ्ठल मंदिर भाग १ काँक्रीटीकरण १० लाख, माळवाडी ते विठ्ठल मंदिर भाग २ काँक्रीटीकरण १० लाख, गावांतर्गत पेव्हींग ब्लॉक १० लाख, काताळवेढा जि प शाळा डोंंगरवाडी पेव्हिंग ब्लॉक १० लाख, जि. प. शाळा पेव्हिंग ब्लॉक १० लाख, तिखोल बिरोबा मंदिर ते भाऊसाहेब ठाणगे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, जवाहरलाल ठाणगे वस्ती ते पडळी वस्ती रस्ता काँक्रीटीकरण १० लाख,  गणेश मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक १० लाख. 

          नांदूरपठार शिवाजी वाडी ते गाढवदरा पाझर तलाव रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, देवी आई मंदिर गाढवे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, पाबळ गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक १५ लाख, गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख, अळकुटी गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे १५ लाख, गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १५ लाख, शेरी कासारे गावांतर्गत पेव्हींग ब्लॉक १५ लाख, गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण १५ लाख.