१० मार्च रोजी मोतीबिंदू व कानाच्या आजाराचे शिबिर- डॉ. चंद्रकांत गिरगुणे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आनंद ऋषीजी नेत्रालय व राम रामेश्वर फाउंडेशन, दिव्यांग व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी मोतीबिंदू व कानाच्या रोगाचे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती राम रामेश्वर फाउंडेशनचे डायरेक्टर अक्षय गिरगुणे यांनी दिली.
सदर शिबिरात कानाच्या रोगाचे निदान करून ऐकू न येणाऱ्या पेशंटला रु. ७००० किमतीचे श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या शिबिरात दंत रोगाचे निदान डॉ. महेश इघे करणार आहेत. आतापर्यंत ४७७८ मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या आहेत व यशस्वी ८२ वे शिबीर संपन्न होत आहे.
येताना कृपया कुपन झेरॉक्स व आधार कार्ड घेऊन यावे.
सदर शिबिर संत गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये संपन्न होत असून पंचक्रोशीतल्या जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. गिरगुणे व मधुकर घाडगे यांनी केले आहे.
