बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय मंचर या ठिकाणी निवेदन देण्यात आले
राज्य सरकारने उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि तालुक्यातील गावे ही बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे या भागांमध्ये शेतकऱ्यांवर बिबट्याचे होणारे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे अनेक जण बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेले आहेत दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असल्याने बिबट्याचे हल्ले देखील त्याच प्रमाणात वाढत चालले आहेत वीज वितरण कंपनीकडून शेतीपंपासाठी रात्रीचा वीज पुरवठा केल्याने शेतकऱ्याला रात्री जीव मुठीत घेऊन शेती पिकांना पाणी द्यावे लागत आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जंगली जनावरांच्या हल्ल्यापासून तेथील शेतकऱ्यांची संरक्षण व्हावे म्हणून त्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकार व वीज वितरण कंपनी घेऊ शकते तर त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातील बिबट्याप्रवण क्षेत्र असलेल्या भागात शेतीपंपास दिवसा करण्याचा निर्णय का घेतला जाऊ शकत नाही याबाबत गांभीर्याने विचार करून राज्य सरकार व महावितरण कंपनीने योगी निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना या संकटातूनमुक्त करावे अन्यथा येथील शेतकऱ्यांना शेती करणेअवघड होईल तरी याबाबत लवकरात लवकर योग्य ते निर्णय घ्यावा अन्यथा या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सांगितले
