संदिप संभाजी पानसंबळ यांचे अपघाती निधन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
नादुरुस्त झालेल्या पाॅकलेनचे काम करत असताना पाॅकलेनची स्प्रिंग निसटून जवळच उभा असलेले संदिप पानसंबळ यांच्या कपाळावर जोरात लागली. सदर घटना दि. १७ जून २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालूक्यातील डिग्रस परिसरात घडली.
दि. १७ जून २०२४ रोजी दुपारी एक वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील वन विभागाच्या नरसाळी येथे वन्य प्राणी बिबटचे उपचार केंद्र निर्मितीचे काम सुरू आहे. संबंधित कामाची पायाभरणी पूर्ण केल्यानंतर पोकलॅनमध्ये बिघाड झाला. ठेकेदार तथा पोकलॅन मालक यांच्या निगराणीत पोकलॅनची चैन बसविण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाची पिन चैन जोडणी करण्यासाठी ठोकत असतानाच स्प्रिंगचा अधिक दाब निर्माण होऊन उडालेली पिन ठेकेदार संदिप संभाजी पानसंबळ, वय ४५ वर्षे, रा. सडे, यांच्या कपाळावर जोरात लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
घटना समजताच राहुरी परिसरातून मोठा शोक व्यक्त करण्यात आला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नावलौकिक करणारे पानसंबळ यांच्या अकाली मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. नगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात सडे (ता.राहुरी) ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
