Type Here to Get Search Results !

पुणे - मुरलीधर मोहोळ यांची खासदार म्हणून निवड झाल्याने पर्वती मतदारसंघात श्रीनाथ भिमाले यांचे पारडे जड


 


मुरलीधर मोहोळ यांची  खासदार म्हणून निवड झाल्याने पर्वती मतदारसंघात श्रीनाथ भिमाले यांचे पारडे जड


 पुणे प्रतिनिधी: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी १ लाख 23 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मोहोळ यांच्या विजयात कोथरूडसह पर्वती आणि कसबा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. मोहोळ यांना खासदारकीच्या शुभेच्छा देतानाच भाजपमधील नेत्यांचे महापालिका आणि विधानसभेचे फोटो असलेले बॅनर्स शहरात झळकू लागले आहेत. त्यामुळे लोकसभेचा निकाल लागताच आता इच्छुकांनी पालिका आणि विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे. यातच सगळ्यात जास्त चर्चा होते आहे ती पर्वती मतदार संघाची 


पर्वती विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत  मोहोळ यांना जवळपास ३० हजारांचे मताधिक्य मिळाले होते  येथे  विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे अनेक नगरसेवक देखील याच मतदारसंघात असल्याने हे शक्य झाले.परंतु महापालिकेतील कार्यकाळात महापौर मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची मैत्री सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे पुणे लोकसभा समन्वयक म्हणून भिमाले यांची कामगिरी ही पर्वती मतदारसंघात तसेच पुणे शहरात अचूक  झाल्याने  मोहोळ यांना प्रचंड असे बहुमत मिळाले  होते.लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचे विधानसभा निवडणूक लढवण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने पर्वती मतदारसंघात माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मोहोळ यांना शुभेच्छा देणारे अनेक  बॅनर्स भिमाले यांच्या वतीने उभारण्यात आले असून यावर विधानसभेचा फोटो असून त्यांनी एक प्रकारे आपणही मैदानात असल्याचं जाहीर केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत श्रीनाथ भिमाले यांना पुणे मतदारसंघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली होती. या माध्यमातून त्यांनी प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतानाच पक्षीय यंत्रणेत महत्त्वाची भूमिका निभावली. गेल्या अनेक वर्षांपासून भिमाले पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत आहेत. 2017 मध्ये पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांची सभागृह नेते पदी वर्णी लागली होती. पर्वती विधानसभा मतदार संघ हा मिसाळ कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो.परंतु महापालिकेच्या माध्यमातून मतदार संघात केलेली कामे जुना चेहरा नको म्हणून मतदार संघात नवीन चेहेरा हवा अशी स्थानिक नागरिकांची मागणी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक आणि आता दिल्लीत  मुरलीधर मोहोळ यांची खासदार म्हणून निवड झाल्याने श्रीनाथ  भिमाले यांचे बळ अनेक पटींनी वाढले आहे. या मुळे चर्चा काहीही असो पण पर्वती मध्ये यावेळेस भिमाले यांचे पारडे नक्की जड मानले जात आहे.