Type Here to Get Search Results !

राहुरी - बंद घराचे कुलूप तोडून दुचाकीसह घरगुती वस्तू पळवील्या.


 

बंद घराचे कुलूप तोडून दुचाकीसह घरगुती वस्तू पळवील्या.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


अज्ञात भामट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरातील एका मोटारसायकल सह इतर गृहपयोगी वस्तू चोरुन नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे ४ जून रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


नाझिम हमीद सय्यद, वय ५३ वर्षे, हे मुंबई येथे राहत असून त्यांचे राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे घर आहे. दि. १६ मे २०२४ रोजी नाझिम सय्यद हे त्यांच्या घराला कुलूप लावून मुंबई येथे गेले होते. दि. ४ जून २०२४ रोजी मध्यरात्री दरम्यान अज्ञात भामट्यांनी सय्यद यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला. 


तेव्हा भामट्यांनी घरातील एक ॲक्टिव्हा दुचाकी तसेच फॅन, इस्त्री अशा घरगुती वस्तू चोरुन नेल्या. नाझिम हमीद सय्यद यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्या विरोधात गून्हा रजि. नं. ६७४/२०२४ भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे घरफोडीचा गून्हा दाखल करण्यात आला.