मागील भांडणाच्या कारणावरून दोघा भावांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी दोघा भावांना शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील शनीचौक येथे दि. १० जून २०२४ रोजी घडलीय.
अमोल राम गायकवाड, वय १९ वर्षे, रा. मुलनमाथा, ता. राहुरी. याने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १० जून २०२४ रोजी रात्री ८ वाजे दरम्यान अमोल गायकवाड व त्याचा चुलत भाऊ रमेश लक्ष्मण गायकवाड हे दोघे पल्सर गाडीवर शनी चौकातुन घरी जात होते.
त्यावेळी आरोपींनी त्यांना शनीचौक येथे अडवीले आणि मागील भांडणाच्या कारणावरुन त्यांना शिवीगाळ दमदाटी करत लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच तु जर परत आमच्या नादी लागला तर तुला जिवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली आहे.
अमोल राम गायकवाड याच्या फिर्यादीवरून आरोपी पप्पु ऊर्फ अतुल बबन गायकवाड, अमित ऊर्फ भावड्या बबन गायकवाड, करण (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही.), इतर दोन अनोळखी तरुण अशा पाच जणांवर गून्हा रजि. नं. ६८९/२०२४ भादंवि कलम १४३, १४७, ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आलाय.
