Type Here to Get Search Results !

राहुरी - ऊसने दिलेले १५ हजार रुपए परत मागीतले म्हणून लोखंडी पाईपने मारहाण.


 

ऊसने दिलेले १५ हजार रुपए परत मागीतले म्हणून लोखंडी पाईपने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


ऊसने म्हणून दिलेले १५ हजार रुपए परत मागीतल्याच्या कारणावरुन आरोपीने काशिनाथ खरात यांना दमदाटी करत लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील माहेगाव, महाडुक सेंटर येथे दि. १७ जून २०२४ रोजी घडली.


नानासाहेब कानिफनाथ खरात, वय ३९ वर्षे, रा. महाडुक सेंटर, माहेगाव, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, नानासाहेब खरात यांनी दिड महिन्यापूर्वी रामदास खोसे याला १५ हजार रुपए ऊसने दिले होते. 


दि. १७ जून २०२४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास नानासाहेब खरात व रामदास नारायण खोसे हे दोघेजण दर्शन हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नानासाहेब खरात यांनी रामदास खोसे याला ऊसने दिलेले १५ हजार रुपए परत मागीतले. 


त्यावेळी रामदास खोसे मला म्हणाला की, तु माझ्यासोबत माझे घरी चल, तिथे गेल्यावर मी तुला पैसे देतो. असे म्हणालेवर ते दोघे खोसे याच्या घरी गेले. तेथे रामदास खोसे नानासाहेब खरात यांना म्हणाला की, तु मला कधी पैसे दिले होते, तु मला का पैसे मागतो. असे म्हणुन वाईट वाईट शिवीगाळ केली.


तसेच शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली. आणि तुला सोडणार नाही, तुझ्याकडे पाहुन घेतो, अशी धमकी दिली. घटनेनंतर नानासाहेब कानिफनाथ खरात यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी रामदास नारायण खोसे, रा. महाडुक सेंटर, माहेगाव, ता. राहुरी, याच्या विरोधात गून्हा रजि. नं. ७२३/२०२३ भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला.