पारनेर येथे अ.ए.सो.चे सेनापती बापट विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
योग दिनाच्या निमित्ताने योगाचे मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य भारतीचे डॉ.किशोरकुमार पुरकर,शाला समिती चेअरमन श्री.अनिलकुमार भंडारी,शाला समिती सदस्य श्री.संजय पतके,श्री.अमित जाधव तसेच ब्रिटानिया समुहाचे श्री.शेळके व मयुरी जमदाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.काकडे सर यांनी केले.विद्यालयाचे योग अभ्यासक श्री.शिंगाडे सर यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व पटवून दिले.श्री.शिंगाडे सर व डॉ.पुरकर यांचे मार्गदर्शनाखाली योगासनांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कुलकर्णी सर व पर्यवेक्षक श्री.भांड सर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले.
कार्यक्रमात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील एकूण २३ शिक्षकांनी सहभाग घेतला.तसेच११३ विद्यार्थी व १२९ विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला.
ब्रम्ह कुमारी विश्वविद्यालयाच्या प्रतिनिधी साधना दिदी यांनी ही योगाचे महत्त्व विशद केले. श्री.बनकर सर यांनी उपस्थित पाहुणे व पालकांचे आभार व्यक्त केले.
शेवटी ब्रिटानिया समुहाकडून सर्व विद्यार्थ्यांना चिक्की चे वाटप करण्यात आले.
