नांदेड - बाबा रमजान गल्लीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी.
प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड
नांदेड/किनवट दि,२१:- किनवट येथील बाबारमजान गल्ली येथे नळांना पाणीच येत नसल्याने यापूर्वी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.परंतु आता टँकर पण या वार्डात व बाबारमजान गल्लीत येत नसून टँकर पुरवठा करणारे कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या संगणमताने टँकर पुरवठा केला जात आहे. एक आठवड्यात दोनदा टँकर येत आहे तरी कधी कधी आठवडयातून एकदाच येत आहे काही वार्डात डेली टँकर चालू आहे असं
किनवट येथील बाबारमजान गल्लीतील जनतेच म्हणणं आहे आधिच नळाला पाणी येत नसतांना टँकरद्वारे नियोजीत पाणीपुरवठा करणारे न.पा. कर्मचारी यांना सांगल्यावरही ते टँकर पाठवत नाही नळ ही सोडत नाही पाईप लाईन सुद्धा झालेली आहे ते पण पाणी आतापर्यंत चालू झालं नाही बाबा रमजान गल्ली येथील रहिवासी असलेले सय्यद अजहर यांनी इतर नागरिकांनी लेखी निवेदन न. प. चे मुख्याधीकरी यांना देऊन तक्रार सुद्धा केलेली आहे निवेदन नाची तारिक.६/६/२४ रोजी दिले होती नळामध्ये आत्तापर्यंत पाणी आलं नाही टॅंकर येत नाही हर घर नळ योजना ठरली कुचकामी किनवट नगर परिषद कडून पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवण्याची मागणी बाबा रमजान येथील नागरिकांनी केली आहे.
