Type Here to Get Search Results !

राहुरी - कपाटाचे लॉकर तोडून तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने पळवीले.


 

कपाटाचे लॉकर तोडून तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने पळवीले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


अज्ञात भामट्याने बंद घराचा दरवाजा उघडुन आत प्रवेश केला. आणि कपाटातील तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने चोरुन नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील खडांबे खुर्द येथे दि. २ जून २०२४ रोजी उघडकीस आली. 


निवृत्ती नामदेव खळेकर, वय ५४ वर्षे, या राहुरी तालूक्यातील खडांबे खुर्द येथे राहतात. दि. १ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजे सुमारास निवृत्ती खळेकर हे घराचे बाहेर ओट्यावर झोपले. तर त्यांची पत्नी रजनी ह्या घरामध्ये आतमधुन लावुन झोपल्या होत्या. 


दि. २ जून २०२४ रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात भामटा निवृत्ती खळेकर यांच्या घराचा दरवाजा उघडुन आत प्रवेश केला. आणि घरात असलेल्या कपाटातील लाॅकर तोडून तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने घेवुन पसार झाला. सकाळी उठल्या नंतर घरात चोरी झाल्याचे खळेकर यांच्या लक्षात आले. 


निवृत्ती नामदेव खळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गून्हा रजि. नं. ६६२/२०२४ भादंवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.