चार दिवसात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध
आरोपी कोहकडे याच्यावर बलात्कार व पोस्को अंतर्गत वाढीव कलम.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
चार दिवसांपूर्वी राहुरी तालूक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणा विरोधात अपहरणचा गून्हा दाखल करण्यात आला होता. राहुरी पोलिस पथकाने पिडीत मुलीचा शोध घेऊन आरोपीच्या तावडीतून तीची सूटका केली.
चार दिवसांपूर्वी राहुरी तालूक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणा विरोधात अपहरणचा गून्हा दाखल करण्यात आला होता.
गून्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पिंगळे हे पिडीत मुलीचा शोध घेत होते. दरम्यान आरोपी हा पिडीत मुलीला घेऊन राहुरी तालूक्यातील राहुरी फॉरेस्ट, भांगडा डोंगरात लपून बसले बाबत माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पिंगळे, पोलीस हवालदार आवारे, सोमनाथ जायभाय, महिला पोलिस हवालदार कोळेकर, नाचन, सोळसे, पोलिस नाईक कोकाटे, पोलिस शिपाई रवी पवार, चेमटे यांनी छापा टाकला. यावेळी पोलिस पथकाने पिडीत मुलीला ताब्यात घेतले. मात्र आरोपी डोंगरातील झाडांचा फायदा घेऊन पळून गेला.
दरम्यान आरोपीने पिडीत मुलीवर बलात्कार केल्याने आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी, याच्यावर बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत कलम वाढ करण्यात आली. पोलिस पथकाकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
