बांध फोडल्याच्या कारणावरुन वयोवृद्धाला काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तु शेत जमीनीचा सामाईक बांध फोडला आहे, असे म्हणुन आरोपीने केरबा बोरकर यांना लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ३१ मे २०२४ रोजी राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे घडलीय.
केरबा रामचंद्र बोरकर, वय ७१ वर्षे, रा. बिरोबावाडी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,
दि. ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास केरबा बोरकर हे देवळाली प्रवरा गावाचे शिवारातील शेत गट नंबर ५८९ मधील ऊसाचे क्षेत्रास पाणी धरत असतांना अमोल साठे हा त्याने सतिश विठठल पुंड यास दहा गुंठे विकलेले क्षेत्र मोजुन देत होता.
त्यावेळी अमोल भानुदास साठे हा केरबा बोरकर यांना म्हणाला की, तु शेत जमीनीचा सामाईक बांध फोडलेला आहे. असे म्हणुन तो शिवीगाळ करु लागला. तेव्हा केरबा बोरकर त्यास म्हणालो की, तुला जर तसे वाटत असेल तर तु तुझे क्षेत्र मोजुन घे. असे म्हणालेचा त्यास राग आल्याने त्याने केरबा बोरकर यांना लाकडी काठी व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच तु जर सामाईक बांधावर दिसला तर तुझे तंगडे तोडुन टाकतो, अशी धमकी दिली.
केरबा रामचंद्र बोरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल भानुदास साठे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. याच्यावर गून्हा रजि. नं. ६५६/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.
