Type Here to Get Search Results !

पारनेर - बनावट ए टी एम कार्ड चा वापर करुन आर्थिक फसवणुक करणारे आरोपी गजाआड - पारनेर पोलिसांची बेधडक कारवाई


 

बनावट ए टी एम कार्ड चा वापर करुन आर्थिक फसवणुक करणारे आरोपी गजाआड


पारनेर पोलिसांची बेधडक कारवाई



पारनेर/प्रतिनिधी : 

   पारनेर शहरातील दि. 17 जून 2024 रोजी सेजल कॉम्पेक्स मधील एस. बी. आय बँकेच्या ए. टी. एम मध्ये पैसे काढत असताना अनोळखी इसमाने पैसे काढता येत नाही काय असे म्हणून ए. टी. एम कार्ड घेवुन  नजर चुकवुन, हातचलाखीने बदलुन त्यांच्याकडील बंद पडलेल्या खात्याचे ए. टी. एम कार्ड हे फिर्यादीला देवुन ए. टी. एम कार्डचा पिन नंबरचा वापर करुन खात्यातुन वेळोवेळी 34, 020/- रुपये काढुन आर्थिक फसवणुन करण्यात आली.

    अशा प्रकारचे फसवुणीकीचा गुन्हा पारनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं-436/2024 भा. द. वि कलम 420 प्रमाणे दि- 19 जून 2024 रोजी दाखल असुन मा. पोलीस अधिक्षक सो. अहमदनगर श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. खैरे सो. उपविभागिय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण संपत भोसले यांचे मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सदर फसवणुक करणारी टोळीवर कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या सदर सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खंडागळे पो.हे.कॉ./2205 श्यामसुंदर गुजर, पो.कॉ. /1535 जगदिश बुधवंत पो. कॉ./14 सागर धुमाळ पो. कॉ. / 263 सारंग वाघ पो. कॉ. /1899 देविदास अकोलकर तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेल चे मपोहे/ 1540 ज्योती काळे, पो. कॉ.  2556 राहुल गुंडु, पो. कॉ/2435 नितिन शिंदे परीसरात जावुन विविध ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज ची तपासणी करण्यास सागितले होते.

    त्यानुसार सी सी टी व्ही फुटेज व डम डाटाचे आधारे आरोपीचा शोथ घेत असताना नगर तालुक्यातील खंडाळा गावचे शिवारात रस्त्यालगत असलेल्या हॉटेल सांयतारा जवळ सापळा रचुन दोन आरोपी  मल्हारी दत्तात्रय शेंडगे वय-34 वर्षे रा. वनगळी ता. इंदापुर जि. पुणे, अमोल भगवान शेंडे वय-35 वर्षे रा काटी ता इंदापुर जि पुणे यांना ताब्यात घेतले त्यांना गुन्हयाविषयी अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यानंतर शेवगांव येथे दि-27 जून 2024 रोजी 79,000/-रुपये एवढी फसवणुक केली असल्याची कबुली दिली. त्यात शेवगांव पोलीस स्टेशन येथे संपर्क केल्यानंतर तेथेही गु र नं 584/2024 भा.द.वि कलम 420,406 प्रमाणे दि-09 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल असल्याचे समजले त्यांनतर अधिक चौकशी केली असता त्यांचेवर सोलापुर, कोल्हापुर, बेळगांव येथे फसवणुक, आर्म अॅक्ट सारखे गंभीर गुन्हे असल्याचे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. 


चौकट : 


 आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल..


   सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन 1.15,000/- रु किमतीचा विवो कंपनीचा ब्राऊन रंगाचा मोबाईल त्यात 9270092809 या क्रमांकाचे सीमकार्ड असलेला 2. 15,000/- रु किमतीचा ओपो कंपनीचा करडया रंगाचा मोबाईल त्यात 9172760440 या क्रमांकाचे सीमकार्ड असलेला 3. 1730 रु रोख रक्कम त्यात 500 रु दराच्या 03 नोटा, 100 रु दराच्या दोन नोटा, 20 दराची एक नोट, 10 रुपये दराची एक नोट असा 31,730 /- रु.कि.चा माल जप्त करण्यात आलेला आहे.