मंचर शहरातील धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले (लक्ष्मी रोड) मार्गा वरील खड्या संदर्भात नगरपंचायत ला निवेदन देण्यात आले...
मंचर शहरातील पुणे नाशिक रोड जवळील मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात भाजप नेते जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून नगरपंचायत ला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने म्हटले आहे की,सध्या पावसाचे दिवस आहे मंचर शहरातील मुख्य बाजारपेठेकडे जाणारा मार्ग धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले (लक्ष्मी रोड) यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. पावसाचे पाणी त्या खड्डयात साचल्यामुळे नागरिकांना ते खड्डे समजून येत नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय त्या ठिकाणी होत आहे.
तसेच जेष्ठ नागरिकांचेही अपघात त्या ठिकाणी होत आहे त्यामुळे आपण उपाययोजना करून लवकरात लवकर हे सर्व खड्डे बुजवण्यात यावे.
तसेच संपूर्ण मंचर शहरांमध्ये पाहणी करून रोडवरील खड्डे त्वरित बुजवावे या संदर्भात निवेदन देण्यात आले...
