Type Here to Get Search Results !

राहुरी - गायके कुटुंबाला लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.


 


गायके कुटुंबाला लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


काही एक कारण नसताना आरोपीने दारु पिऊन तिघा जणांना शिवीगाळ करत लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ९ जूलै २०२४ रोजी राहुरी तालूक्यातील धामोरी खुर्द येथे घडली.


गिताराम भास्कर गायके, वय २७ वर्षे, रा. धामोरी खर्द, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ९ जूलै २०२४ रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान गिताराम गायके हे घरी असताना पत्र्यावर दगड फेकल्याचा आवाज आला. 


तेव्हा गिताराम गायके यांनी घराचे बाहेर येवुन पाहीले. त्यावेळी आरोपी हा दारु पिऊन त्यांना शिवागाळ करु लागला. तसेच आरोपीने गिताराम गायके व त्यांच्या आई वडीलांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. आणि जिवे मारण्याची धमकी दिली. 


गिताराम भास्कर गायके यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल शंकर पवार, रा. खंडाबे, ता. राहुरी, याच्यावर गून्हा रजि. नं. ७९९/२०२४ भादंवि कलम भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.