Type Here to Get Search Results !

राहुरी - कळमकर यांना लोखंडी पाईप व काठीने मारहाण, तिघांवर गून्हा दाखल.


 


कळमकर यांना लोखंडी पाईप व काठीने मारहाण, तिघांवर गून्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आरोपींनी रात्रीच्या दरम्यान कोंडदेवाचार्य कळमकर यांच्या घरात घुसून लई माजलास का? तुला वांबोरीत येवु देणार नाही. असे म्हणुन शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील कात्रड येथे दि. ३ जूलै २०२४ रोजी घडली. 


कोंडदेवाचार्य गिरीश कळमकर, वय ३० वर्षे, रा. कात्रड, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ जूलै २०२४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कोंडदेवाचार्य कळमकर हे घरी एकटे असताना आरोपी घरात घुसले. 


आणि म्हणाले कि, तु लई माजलास का? तुला वांबोरीत येवु देणार नाही, असे म्हणुन शिवीगाळ करुन लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा आमचे नादी लागला तर तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी जिवे मारण्याची धमकी देवुन तेथुन निघुन गेले. त्यानंतर आरोपींनी दि. ५ जूलै २०२४ रोजी पून्हा कोंडदेवाचार्य कळमकर यांना लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.


घटनेनंतर कोंडदेवाचार्य गिरीश कळमकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी संजय चंद्रकांत वेताळ, भारत (पुर्ण नाव माहीत), बाळु (पुर्ण नाव माहीत नाही) या तिघांवर गून्हा रजि. नं. ७९७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१ (३), ३५१ (२), ३३३, ११९ (१), ११८ (१), ११५ (२) प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.