नांदेड - दहेली तांडा ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेचे दोन रंग अभियानाची सुरुवात.
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट,दि , १०:- दहेली तांडा येथे आज दिनांक 10 /7/2024 रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वच्छतेचे दोन रंग या अभियानाची सुरुवात आज करण्यात आली अभियानानंतर गुगल सीट मध्ये फॉर्म भरण्यात आले. केव्हा गावातील सरपंच सौ मनीषा जयवंत तोडसाम उपसरपंच दारासिंग नानू जाधव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी डीए चव्हाण अंगणवाडी सेविका जयश्री मार शेट्टीवर आशाबाई राठोड, रोजगार सेवक अरुण राठोड महिला बचत गट प्रतिनिधी आणि गावातील नागरिक उपस्थित होते या सर्वांना ग्रामसेवक यांनी सदर अभियानाची ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यामध्ये तर सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यामध्ये जमा करण्यात यावा व सर्व जबाबदार व्यक्ती अधिकारी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन लोकांना स्वच्छते विषयी जनजागृती करावी यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
