Type Here to Get Search Results !

राहुरी - झाड तोडण्याच्या कारणावरुन भावाकडून भावाला शिवीगाळ कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण.


 


झाड तोडण्याच्या कारणावरुन भावाकडून भावाला शिवीगाळ कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


झाड तोडण्याच्या कारणावरुन सख्ख्या भावाने भावाला शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथे दि. २१ जुलै २०२४ रोजी घडलीय. 


भाऊसाहेब मुक्ता बाचकर, वय ५९ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील गंगाधर वाडी, वावरथ जांभळी, ता. राहुरी, येथे कुटुंबासह राहतात. दि. २१ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ वाजे सुमारास आरोपी हा शेतातील आबांच्या बागेमधील झाड तोडत होता. 


तेव्हा भाऊसाहेब बाचकर यांनी आरोपीला झाड का तोडले, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने भाऊसाहेब बाचकर यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. तसेच तु जर माझ्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.


भाऊसाहेब मुक्ता बाचकर यांच्या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ आरोपी रावसाहेब मुक्ता बाचकर, रा. वावरथ जांभळी, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ८३३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.