Type Here to Get Search Results !

राहुरी - बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागीने पळवीले.


 


बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागीने पळवीले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील ताराबाद येथे अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे ताहराबाद परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. 


मच्छिंद्र बाळासाहेब औटी, वय ४० वर्षे, यांचे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे घर असून त्यांचे दुसरे घर ताराबाद येथील त्यांच्या शेतात आहे. ते सध्या शेतातील घरात राहत आहेत. दि. २१ जुलै २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात भामट्यांनी औटी यांचे ताहराबाद गावातील घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. 


घरातील सामानाची उचकापाचक करुन भामट्यांनी घरातील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे व ५ हजार रुपए रोख रक्कम असा मु‌द्देमाल चोरुन नेला. २२ जुलै २०२४ रोजी सकाळी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. 


मच्छिंद्र बाळासाहेब औटी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ८३२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.