Type Here to Get Search Results !

राहुरी - दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींकडून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त.



 दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींकडून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात १८ जुलै २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला राहुरी पोलीस पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले. मात्र दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पथकाने त्यांना देखील ताब्यात घेतले असून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


राहुरी तालूक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर गुहा परिसरात काही लोक पांढर्‍या रंगाची मालवाहतूक गाडी व दुचाकीवर येऊन दरोड्याच्या तयारीत असल्याची खबर रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला मिळाली. त्यावेळी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, रविंद्र पिंगळे, पोलीस उप निरीक्षक धर्मराज पाटील, चालक पोलीस हवालदार शाकुर सय्यद, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रवीण बागुल, विकास साळवे, सतीश आवारे, बाबासाहेब शेळके, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजणे, आदिनाथ पाखरे, नदीम शेख, गोवर्धन कदम, रोहित पालवे, गणेश लिपणे, अमोल भांड, पोलीस नाईक मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोलिस नाईक सचिन धनाड, संतोष दरेकर आदि पोलिस पथकाने गुहा परिसरात छापा टाकला. 


त्यावेळी पोलिस पथकाने सुखदेव रामदास खिलदकर, वय ३० वर्षे व साहिल सिकंदर सय्यद, वय २५ वर्षे, दोघे रा. नांदूर, ता. आष्टी, जि. बीड, तसेच अरुण बाळासाहेब बर्डे, वय २२ वर्षे, सोमनाथ रामदास गायकवाड, वय २७ वर्षे, शक्तिमान रामदास गायकवाड, तिघे रा. कुरणवाडी, ता. राहुरी. या पाच जणांना ताब्यात घेतले. आणि बाळू लहानु गायकवाड व नवनाथ तुकाराम पवार हे दोघेजण पसार झाले आहेत.


पकडलेल्या आरोपींकडून मोबाईल टाॅवरच्या बॅटऱ्या धारदार शस्त्र, दोर्‍या, स्क्रू ड्रायव्हर, वेगवेगळे पान्हे, केबल कटर, लोखंडी कत्ती, लाइटर असा लोखों रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करत आहेत.