बाळासाहेब जाधव यांना कुऱ्हाडीचा दांडा, काठी व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आमच्या आईला शिव्या का दिल्या असे म्हणुन दहा आरोपींनी मिळुन बाबासाहेब जाधव यांना कुऱ्हाडीचा दांडा, काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव शिवारात घडली.
बाळासाहेब छबुराव जाधव, वय ५० वर्षे, हे अहमदनगर येथील सिध्दार्थ नगर, येथे राहत असुन त्यांची राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे शेतजमीन आहे. बाळासाहेब जाधव हे दुपारच्या दरम्यान आरडगाव शिवारातील त्यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाला खत टाकत होते.
त्यावेळी तेथे आरोपी आले आणि आमच्या आईला शिव्या का दिल्या असे म्हणुन आरोपींनी बाळासाहेब जाधव यांना कुऱ्हाडीचा दांडा, लाकडी काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच नगरला कसा जातो, तेच पाहतो. याला जिवच मारतो, अशी धमकी दिली.
बाळासाहेब छबुराव जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब सुरेश जाधव, दादु सुरेश जाधव, अवि राजेंद्र जाधव, शालन सुरेश जाधव तसेच अनोळखी सहा इसम अशा दहा जणांवर गुन्हा रजि. नं. ८३१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १८९ (२), १९०, १९१ (१), १९१ (३), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
