Type Here to Get Search Results !

टाकळी ढोकेश्वर : ढोकेश्वर जुनिअर कॉलेज चा कब्बड्डीचा संघ तालुक्यात प्रथम

 ढोकेश्वर जुनिअर कॉलेज चा कब्बड्डीचा संघ तालुक्यात प्रथम



 जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड

सलग तीन वर्ष जिल्हा पातळीवर  निवड

   टाकळी ढोकेश्वर: शालेय क्रीडा विभाग अहमदनगर आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या पारनेर तालुका  स्तरीय कब्बड्डी स्पर्धांमध्ये ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कब्बड्डी संघाने अटीतटीच्या अंतिम सामान्यात  साईनाथ विद्यालय अळकुटीच्या संघाचा 22 - 19 ने पराभव केला व पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वरचा खो खो आणि कब्बड्डी मधे दबदबा असल्याचे सिद्ध केले.

       श्री संत निळोबाराय विद्यालय राळेगण सिद्धी येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कब्बड्डी स्पर्धेत एकूण 19 वर्षाखालील 7 संघांनी सहभाग नोंदविला. ढोकेश्वर जुनिअर कॉलेजच्या संघाने सेमीफायनल मधे आदर्श विद्यालय खडकवाडी च्या संघाचा एकतर्फी 20 - 1 ने  धुव्वा उडवत फायनल मधे धडक मारली. फायनल सामान्यात पंच म्हणून  मेजर माऊली मापारी, सचिन मापारी तर सरपंच म्हणून बापूराव होळकर यांनी कामकाज पाहिले.

संघांचे  नेतृत्व ओमं झावरे याने केले. ढोकेश्वरच्या संघात ओंकार झावरे, ओमं थोपटे, शिवम क्षिरसागर, अस्तित्व झावरे, प्रथमेश  पानमंद, सुरज  चिकणे, सौरभ काकडे, सौरभ दाते, स्वराज शेळके, सिद्धेश रोकडे, अर्जुन रोकडे, समीर रोकडे, श्रुतम  रोकडे, कृष्णा राहीन्ज, गौरव ठाणगे, सुजल वाळुंज यांनी प्रतिनिधित्व केले. या खेळाडूंना मार्गदर्शन प्रा.अनिकेत बांगर, प्रा.सुनिल झावरे यांनी केले. 

        विद्यालयाचा हा संघ सलग तीन वर्ष  पारनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्याला करत आहे. या संघातील खेळाडूंचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य सुनिल वाव्हळ, पर्यवेक्षक शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी  पत्रकार गणेश जगदाळे, कला विभाग समन्वयक विजय सोबले, बाळासाहेब निवडुंगे, शास्र समन्वयक अशोक गांगड, निलम खिलारी व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

विद्यालयाच्या या विजयी संघांचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे साहेब , सचिव ॲड. विश्वासराव आठरे  पाटील, उपाध्यक्ष डॉ. विवेकजी भापकर, सहसचिव जयंतराव वाघ, खजिनदार ॲड. दिपलक्ष्मी म्हसे मॅडम, संस्थेचे माजी अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम आण्णा खिलारी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य  डॉ. भाऊसाहेब खिलारी, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक यांनी सर्व खेळाडूंचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या  शिक्षकांचे अभिनंदन केले.