पारनेर ग्रामीण पतसंस्थेतर्फे सभासदांना ११ टक्के लाभांश
२१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!
पारनेर : ता. प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील अग्रेसर असलेली पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी संस्थापक चेअरमन काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली मणकर्णिका लॉन्स, मंगल कार्यालय पारनेर येथे संपन्न झाली. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे सर, संचालक बाळासाहेब सोबले, आर. एस. कापसे सर, लक्ष्मण डेरे, मयूर गांधी, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, कृष्णा उमाप, सुभाष राठोड, सुनंदा रामदास दाते, दिलीप दाते, सुनील गाडगे, व सौ आशा शांताराम तराळ तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात उपस्थितीत होते. सभेच्या सुरुवातीला अहवाल सालात दिवंगतांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सुभेदार हरीश औटी व संस्था कर्मचारी प्रशांत जवक यांची मुले ज्ञानेश्वरी व यशराज जवळ यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आल्याबद्दल सत्कार करण्यात आला, तसेच पारनेर तालुक्याचे सुपुत्र देसवडे येथील शिवाजी महाराज दाते लिखित "मराठे का हरले पानिपत" या पुस्तकांच्या प्रती सर्व उपस्थित सभासदांना वाटप करण्यात आल्या. त्यानंतर संस्थेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात २ कोटी ५६ लाख ३५ हजार ३७८ निव्वळ नफा व ऑडिट वर्ग "अ" मिळाल्याचे चेअरमन काशिनाथ दाते सर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले. संस्थेकडे २१ वर्षाच्या कालावधीत मार्च २०२४ अखेर २११ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत, हे सभासदांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. संस्थेची बँक गुंतवणूक ६३ कोटी असून स्थावर मालमत्ता ३ कोटी ८० लाख आहे, संस्थेमार्फत सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले, सभासदांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व व्यवसायासाठी १७१ कोटी रुपये कर्ज वितरण केलेले आहे. संस्थेचे अहमदनगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असून संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, बेलवंडी फाटा, जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा, सुपा, कामोठे(नवी मुंबई), अहमदनगर, वनकुटे, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा १७ शाखा सुरू आहेत. संस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते सर यांनी सांगितले संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, कामोठे, खडकवाडी, आळेफाटा, शिरूर व सुपा येथे स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, सुपा, बेलवंडी फाटा, जामगाव, ढवळपुरी येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले व सभा खेळीमेळी संपन्न झाली. सभेचे सूत्रसंचालन आर. एस. कापसे सर यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे यांनी मानले. यावेळी सभासद व सर्व कर्मचारी उपस्थितीत होते. संस्थेचे सभासदांना संस्थेमार्फत मिष्ठांन भोजन सभा संपल्यानंतर देण्यात आले.
