Type Here to Get Search Results !

राहुरी - कामाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने विवाहित तरुणीला मारहाण.


 


कामाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने विवाहित तरुणीला मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


कामाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दोघा पती पत्नीने कल्पना बर्डे या विवाहित तरुणीला शिवीगाळ करत विट, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली.


कल्पना रुपेश बर्डे, वय ३० वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान कल्पना बर्डे ही गुहा येथील सुनिता ओहोळ यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे कामाचे व हाथ उसणे पैसे मागीतले. तेव्हा त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.


त्यानंतर आरोपींनी कल्पना बर्डे हीला शिवीगाळ करुन विट, लाकडी दांडा व लाथा बूक्क्याने मारहाण केली. तसेच तु जर परत आम्हाला हात उसणे पैसे मागितले तर तुला जिवे मारुन टाकु अशी धमकी दिली आहे. घटनेनंतर कल्पना रुपेश बर्डे हीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी सुनिता किरण ओहोळ व किरण ओहोळ, दोघे रा. गुहा, ता. राहुरी. या पती पत्नीवर गुन्हा रजि. नं. ९७७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (१), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे मारहाण व धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.