मंचर पोलिसांच्या वतीने घेण्यात आली जातीय दंगा काबु योजना रंगीन तालीम
आगामी काळातील गणेशोत्सव मिरवणूक व ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मंचर पोलिसांच्या वतीने मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मैदानात जातीय दंगा काबु योजना रंगीत तालीम घेण्यात आली या तालमीकरिता मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, दोन पोलीस सब इन्स्पेक्टर, पंचवीस पोलीस अंमलदार, पाच होमगार्ड, एक एस.आर.पी.एफ सेक्शन, दोन ॲम्बुलन्स व शांतता कमिटीचे सदस्य सहभागी झाले होते. दंगा काबू योजना रंगीत तालीम सुरू असताना या ठिकाणी मदत दंगा वेळेत पोहोचली होती. तसेच जमाव पांगविताना चार हंटग्रीनेट चा वापर करण्यात आला. त्यातील दोन मिस फायर झाले व दोन फायर झाले असून एक लाँग रेंज सेल गॅस गण ने फायर केला तो मिस फायर झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.


