पंतप्रधान सहाय्यता निधीवरही खा. लंके यांचा वरचष्मा !
तीन रूग्णांना नऊ लाख रूपयांची मदत
पारनेर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीप्रमाणेच पंतप्रधान सहाययता निधीवरही खासदार नीलेश लंके यांचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या शिफारसीवरून नगर दक्षिण मतदारसंघातील तीन रूग्णांना प्रत्येकी तीन लाख रूपयांची मदत मिळाली आहे.
खा. लंके हे आमदार असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांनी आतापर्यंत शेकडो रूग्णांना मदत मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून आजही खा. लंके हे रूग्णांना मिळवून देत आहेत. खा. लंके यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून राज्यात सर्वाधिक रूग्णांना मदत मिळवून दिली आहे. त्याच्या जोडीला आता पंतप्रधान सहाय्यता निधीचीही भर पडली असून जास्तीत जास्त रूग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लंके हे प्रयत्नशिल आहेत.
गुंडेगांव, ता. नगर येथील नीलेश सुखदेव भापकर, थिटे सांगवी ता. श्रीगोंदे येथील जालिंदर गंगाराम जाधव व टिळक रोड, नगर येथील ॠषीकेश अरूण जाधव या तीन रूग्णांना प्रत्येकी तीन लाख रूपयांची मदत पंतप्रधान सहाय्यता निधीमधून प्राप्त झाली आहे.
खा. लंके यांच्या कार्यालयाकडून तीनही रूग्णांच्या मदतीचे प्रस्ताव एकाच वेळी पाठविण्यात आले होते. ते तीनही प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत. आणखी काही रूग्णांच्या मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले असून त्यांनाही लवकरच मदत मिळेल असे खा. लंके यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
▪चौकट
शेवटच्या घटकापर्यंत लक्ष
तुम्ही किती काम करता यापेक्षा कसे काम करता हे खा. लंके यांच्या या तप्तरेतून दिसून येते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लक्ष ठेऊन त्यांना मदत मिळवून देण्यात त्यांची कायम धडपड असते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लंके यांनी राज्यात अव्वल काम केले. आता पंतप्रधान सहाय्यता निधीमध्येही ते देशात अव्वल असतील.
अर्जुन भालेकर
जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
