दोनशे वर्षात प्रथमच प्रधान जिल्हा न्यायाधीश पदी महिला न्यायाधिशाची नियुक्ती.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
अहमदनगर जिल्ह्याच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात जिल्हा न्यायालयातील प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीशाची नेमणूक करण्यात आली.
अहमदनगर जिल्हा न्यायालयातील प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांची अमरावती येथे बदली झाली. त्यांच्या जागी धाराशिव (उस्मानाबाद) येथून अंजू एस. शेंडे यांची बदली झाली आहे.
नगरच्या दोनशे वर्षाच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिले न्यायाधीशाची नियुक्ती झाली आहे. न्यायाधीश शेंडे या १८ सप्टेंबर नंतर अहमदनगर जिल्हा न्यायालयातील पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त समितीच्या अध्यक्ष असतील.
