Type Here to Get Search Results !

राहुरी - हसीना सय्यद हिने भाचा रिजवान याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले.


 


हसीना सय्यद हिने भाचा रिजवान याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


जमिन नावावर करुन घेतली, त्याचे काहीच पैसे दिले नाहीत. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी हसीना सय्यद हिने रिजवान शेख याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. 


रेश्मा यासीन शेख, वय ३६ वर्षे, रा. तनपुरेवाडी रोड, विटभट्टीजवळ, राहुरी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, रेश्मा शेख या दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजे दरम्यान राहुरी तालूक्यातील मानोरी येथे त्यांच्या कुटुंबासह एका कार्यक्रमात गेल्या होत्या. 


त्या कार्यक्रमाला रेश्मा शेख यांची नणंद हसीना अकबर सय्यद व तीचे पती अकबर बाबुभाई सय्यद दोन्ही रा. टाकळिमीयाँ ता. राहुरी, हे तेथे आले होते. कार्यक्रम झालेनंतर रेश्मा शेख यांचे पती अकबर सय्यद यांना म्हणाले की, तुम्ही कडा आष्टी येथील जमीण नावावर करुन घेतली. त्या ठिकाणी मी तुम्हाला सह्या दिल्या. परंतु तुम्ही मला काहीच पैसे दिले नाही.


असे म्हणालेचा राग आल्याने हसीना अकबर सय्यद हीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि तीने रेश्मा शेख यांचा मुलगा रिजवान शेख याच्या डोक्यात दगड मारुन जखमी केले. आमचे नादी लागले तर तुमचा एकाएकाचा काटाच काढु, अशी धमकी दिली.


घटने नंतर रेश्मा यासीन शेख यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी हसीना अकबर सय्यद, अकबर बाबुभाई सय्यद, दोघे रा. टाकळिमीयाँ, ता. राहुरी या दोघांवर गुन्हा रजि. नं. १२२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.