शेतात पाणि सोडल्याच्या कारणावरुन कांता साबळे यांना काठीने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेतात पाणि सोडल्याच्या कारणावरुन आरोपींनी कांता साबळे यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील रामपुर येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी घडलीय.
कांता रमेश साबळे, वय ६५ वर्षे, रा. रामपुर, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ९.३० वाजेच्या सुमारास कांता साबळे या घरी असताना तेथे आरोपी आले. आणि म्हणाले कि, तुम्ही आमचे शेतात पाणी का सोडले. तेव्हा कांता साबळे त्यांना म्हणाल्या कि, आमच्या मोटार आम्ही चार पाच दिवस झाले चालुच केल्या नाही व तुमच्या शेतात पाणी सोडले नाही.
असे म्हणाले असता त्याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी कांता साबळे यांना शिवीगाळ करुन लाकडी काठीने मारहाण केली. तसेच तुम्ही परत आमचे शेतात पाणी सोडले तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
कांता रमेश साबळे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी भास्कर रामचंद्र खळदकर, किरण भास्कर खळदकर, नंदा भास्कर खळदकर, सर्व रा. रामपुर, ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा रजि. नं. १२१६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (२), ३ (५), ३२४ (२), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.