Type Here to Get Search Results !

राहुरी - शेतीमध्ये पाणी का सोडल्याच्या कारणावरुन पती पत्नीला काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण.

शेतीमध्ये पाणी का सोडल्याच्या कारणावरुन पती पत्नीला काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण.

राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.

शेतीमध्ये पाणी का सोडले, आम्हाला शेत नांगरायचे होते, पुन्हा शेतीमध्ये पाणी सोडु नका, असे म्हणालेचा राग आल्याने आरोपींनी दोघा पती पत्नीला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील रामपूर येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. 

नंदा भास्कर खळदकर, वय ५५ वर्षे, रा. रामपुर, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, नंदा खळदकर यांची शेती सात्रळ ता. राहुरी येथे असुन सुरेश मंजाबापु साबळे हे त्यांचे कुटुंबासोबत शेजारीच राहत असुन दोघांची शेती सात्रळ शिवारात शेजारी शेजारी असुन शेतीतील रस्त्याच्या कारणावरुन किरकोळ वाद होत असतात.

दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान नंदा खळदकर व त्यांचे पती हे सुरेश साबळे यांना म्हणाले की, तुम्ही आमचे सात्रळ येथील शेतीमध्ये पाणी का सोडले, आम्हाला शेत नांगरायचे होते, पुन्हा शेतीमध्ये पाणी सोडु नका. असे म्हणालेचा राग आल्याने आरोपींनी दरम्यान नंदा खळदकर व त्यांचे पतीला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बुक्यानी मारहाण केली. 

तसेच पुन्हा आमचे नादी लागले तर जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली. घटनेनंतर नंदा भास्कर खळदकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानूसार आरोपी सुरेश मंजाबापु साबळे, सचिन सुरेश साबळे, नितीन सुरेश साबळे, कांता रमेश साबळे, सर्व रा. रामपुर, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. १२१९ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.