Type Here to Get Search Results !

राहुरी - पहाटेच्या दरम्यान अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण

 


पहाटेच्या  दरम्यान अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातून आज पहाटेच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


या घटनेतील १७ वर्षे ८ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील देवळाली परिसरात तीच्या कुटुंबासह राहते. काल दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजे सुमारास पिडीत मुलगी व घरातील इतर लोक जेवण करुन सर्वजण एका खोलीमध्ये झोपी गेले होते. आज दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे एक वाजे दरम्यान पिडीत मुलीच्या वडिलांना जाग आली.


तेव्हा पिडीत मुलगी घरातून गायब झाल्याचे त्यांना दिसले. तेव्हा नातेवाईकांनी पिडीत मुलीचा घराच्या आजुबाजुच्या परीसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी, कशाचे तरी आमिष दाखवुन मुलीला फुस लावुन पळवून नेले. अशी नातेवाईकांची खात्री झाली.


या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा रजि. नं. १२४१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.