Type Here to Get Search Results !

राहुरी - बियरच्या बाटल्या डोक्यात फोडल्याने एकजण गंभीर जखमी.


 


बियरच्या बाटल्या डोक्यात फोडल्याने एकजण गंभीर जखमी.

राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


दारु पित असताना दोघांमध्ये वाद होऊन दिलीप उर्फ बुच्या कुसमुडे याने गोविंद डुकरे याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून दगडाने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. 


या घटनेतील आरोपी दिलीप उर्फ बुच्या कुसमुडे व गोविंद डुकरे दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी. हे दोघे दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान वांबोरी येथील एका दारुच्या दुकानात दारु पित बसले होते. तेव्हा दारु पित असताना दोघांत वाद झाला. आणि आरोपी दिलीप उर्फ बुच्या कुसमुडे याने गोविंद डुकरे याच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या. तसेच दगडाने मारहाण केली. 


या घटनेत गोविंद डुकरे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परसराम बंडु डुकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप उर्फ बुच्या आंबादास कुसमुडे, रा. राहुरी वेस, वांबोरी, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. १२१४ भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ११८ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.