Type Here to Get Search Results !

पारनेर - ढोकेश्वर विद्यालयात संविधान दिवस साजरा


ढोकेश्वर विद्यालयात संविधान दिवस साजरा

    टाकळी ढोकेश्वर :    पारनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या  टाकळी  ढोकेश्वर विद्यालयात 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच 26/11 2008 ला मुंबईला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध अधिकारी  आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांचे स्मरण करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सुनिल वाव्हळ  हे होते. यावेळी संविधानाची  उद्दे्षिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा यांना पुष्पहार  अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्रियल झावरे आणि कु. अथश्री  ठुबे यांची भाषणे झाली. प्राचार्य सुनिल वाव्हळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पर्यवेक्षक शिवाजी सावंत, प्रा. अशोक गांगड, प्रा. बाळासाहेब निवडुंगे, रवींद्र मते यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले की संविधानाने भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळाला. विद्यार्थ्यांनी न्याय आणि हक्काबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव देखील ठेवली पाहिजे. याप्रसंगी बाबासाहेब जाधव, रवी ज्योतिक, संदीप महांडुळे, निलम खिलारी, सुमन  वाळुंज, वैशाली गायखे, संतोष इंगळे, प्रा. गोवर्धन मते, प्रा. विजय सोबले, प्रा. राजेंद्र ढोणे, नारायण शेळके, मल्हारी वाघसकर,  प्रा. सचिन महानुवर, प्रा. सुनील झावरे, प्रा. भाऊसाहेब खोसे, पोपट  जगदाळे, सोनल  रोहकले, सुशांत खेडकर  इत्यादी शिक्षक  आणि शिक्षकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल सैद यांनी केले तर आभार  प्रा. भाऊसाहेब हिंगडे यांनी मानले.