Type Here to Get Search Results !

राहुरी - मोटारसायकल गोमांस घेऊन जाणार तरुण गजाआड.


 


मोटारसायकल गोमांस घेऊन जाणार तरुण गजाआड.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


गणेश धरम या तरुणाच्या सतर्कतेमुळे राहुरी तालुक्यातील सडे परिसरात मोटारसायकलवर गोमांस घेऊन जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही घटना दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली. 


गणेश आदिनाथ धरम, वय २६ वर्षे, रा. खंडाबे खुर्द, ता. राहुरी या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १.३० वाजे दरम्यान गणेश धरम हा तरुण राहुरी ते सडे मार्गे वांबोरी येथे जात असतांना सडे रेल्वे चौकी जवळील समर्थ पोल्ट्री फॉर्म सडे ता. राहुरी येथे पाठीमागुन एक इसम त्याचे ताब्यातील हिरो डिलक्स मोसा. नं. एम. एच. १७ एटी २७१५ हिचेवरुन गोणीमध्ये गोमांस घेऊन जात असताना दिसला. 


त्यावेळी गणेश धरम या तरुणाने वांबोरी पोलीस चौकीचे हवालदार सुनील निकम यांना फोन करुन माहिती दिली. तेव्हा निकम यांनी सदर आरोपीला पकडून त्याच्या ताब्यातील मोटारसायकल व गोमांस असा एकूण २५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


गणेश आदिनाथ धरम या तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी फिरोज इस्माईल शेख, रा. वांबोरी, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. १२११ भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम ५ सी, ९ ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.