Type Here to Get Search Results !

राहुरी - बाजाराच्या पिशवीतून ४० हजार रु. ची रक्कम पळवीली.


 



बाजाराच्या पिशवीतून ४० हजार रु. ची रक्कम पळवीली.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


सेवानिवृत्त शिक्षकाची बाजाराची पिशवी फाडून त्यात ठेवलेली ४० हजार रुपए रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरुन नेल्याची घटना राहुरी शहरातील आठवडे बाजारात दि. २१ नोव्हेंबर रोजी घडली. 


सुधाकर विठोबा चौधरी, वय ६७ वर्षे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते सध्या पिंप्रीचिंचवड पुणे येथे राहत असून त्यांचे मुळ गाव राहुरी आहे. दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी ते कामानिमित्त राहुरीत आले. सकाळच्या दरम्यान त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडीया राहुरी येथून ४० हजार रुपए रक्कम काढली आणि एका छोट्या पिशवीत घालून ती पिशवी बाजाराच्या पिशवीत ठेवली. 


त्यानंतर दुपारी एक वाजे दरम्यान ते राहुरी शहरातील नवीपेठ परिसरातील पृथ्वी काॅर्नर जवळ बाजार करत असताना अज्ञात भामट्याने सुधाकर चौधरी यांची बाजाराची पिशवी फाडून त्यामधून कागद पत्र व ४० हजार रुपए रोख रक्कम असलेली पैशाची पिशवी काढून चोरुन नेली. काही वेळाने चोरी झाल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. 


सुधाकर विठोबा चौधरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा रजि. नं. १२१० भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.