Type Here to Get Search Results !

राहुरी - राहुरी - रस्ता अपघातात वडिल व मुलाचा जागीच मृत्यू.

 रस्ता अपघातात वडिल व मुलाचा जागीच मृत्यू.



मतदान करण्यासाठी पुणे येथून राहुरीकडे येत असलेले वडिल व मुलगा अपघातात ठार.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आज दि. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुणे येथून राहुरी येथे मोटारसायकलवर येत असलेले वडिल व मुलाचा सुप्या जवळ अपघात होऊन वडिल व मुलगा जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली. 


राहुरी शहरातील मेहेत्रे मळा येथील मनोज हरिभाऊ रासने, वय ४५ वर्षे व यांचा मुलगा सुजल मनोज रासने, वय २० वर्षे, हा पुणे येथे शिक्षण घेत असल्याने तो तेथेच राहत होता. त्याचे वडील मनोज रासणे हे त्याला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते. आज दि. २० नोव्हेंबर २०२४ राहुरी राहुरी येथील विधानसभा निवडणुकीत मतदार करण्यासाठी वडिल मनोज रासणे व मुलगा सुजल रासणे हे दोघे काल दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवर बसून राहुरीकडे येत होते. 


दरम्यान ते पुणे नगर रस्त्यावरील सुपे जवळ असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता कि, वडिल मनोज रासणे व मुलगा सुजल रासणे हे दोघे जागीच ठार झाले. अपघात कसा झाला हे मात्र निश्चित समजू शकले नाही.


वडिल मनोज रासणे व मुलगा सुजल रासणे या दोघांवर आज दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुरी शहरातील गणपती घाट येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. तर त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत मनोज रासने यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.