Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सर्व शिक्षा अभियान यांच्या अंतर्गत वाचादोष शस्त्रक्रिया आज 18 डिसेंबर 2024 रोजी पार पडली


 


श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सर्व शिक्षा अभियान यांच्या अंतर्गत वाचादोष शस्त्रक्रिया आज 18 डिसेंबर 2024 रोजी पार पडली यात 36 बालकांवर वाचादोष शस्त्रक्रिया करण्यात आली याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कोकरे सर यांनी दिली, सध्या जिल्ह्यात सर्व ठिकाणी घेण्यात येत असलेल्या शस्त्र क्रिया या डॉ.महावीर कटारिया यांच्यामार्फत सर्व ठिकाणी शस्त्रक्रिया केली जात आहे, तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा मधील डॉ.अभिजीत तीवाटणे डॉ. नवीन यादव डॉ. काळे डॉ.अनंदकर डॉ. कोंढापुरे डॉ. निमसे डॉ. पाबळे आदी डॉक्टराचे सहकार्य लाभले.

ज्या बालकांना बोलताना अडखळत बोलावे लागत होते त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे अश्या मुलांना वाच्या दोष पासून दूर होण्यास मदत झाली.,

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात ही शस्त्र  करण्यात आली असल्याने कुटुंबांना विना खर्च(मोफत) उपचार मिळाले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोकरे सर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.डांगे मॅडम व गटशिक्षणाधिकारी तसेच श्रीगोंदा तालुक्याचे विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले यासाठी शिक्षक दरेकर सर व त्यांचे पूर्ण सहकारी तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली परिश्रम घेतले व हे शिबिर पार पडले.


यावेळी बोलताना डॉ. तीवाटणे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली यात ज्या बालकांमध्ये गंभीर दोष आढळतात  जसे की हृदयरोग (हृदयाला होल) असणे अपंगत्व , कुपोषित असणे व गंभीर आजार,18 वर्षापर्यंत ज्या बालकांना आजार असतील अशा बालकांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर यांना संपर्क साधावा असे  आवाहन करण्यात आले.