Type Here to Get Search Results !

राहुरी - सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध.


 


सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध.


अपराध्यावर कारवाई करा परंतू निराअपराध्यावर कारवाई करु नये, अशी मागणी.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


परभणी शहरांमध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भात सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या राजव्यापी सामाजिक संघटनेच्या वतीने राहुरी तालुकाध्यक्ष सतीश भांड व राहुरी शहराध्यक्ष विलास जगधने यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व प्रभारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 


या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी एका माथेफिरूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला दगड मारून काच फोडली आहे. प्रतिकृतीला दगड मारून विटंबन करणाऱ्या माथेफिरूला घटनास्थळावरून उपस्थित असलेल्या युवकांनी मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.


सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. आणि विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आहोत. त्याच प्रमाणे दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात बंद दरम्यान दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे. त्या घटनेच्या आम्ही समर्थन करत नाही, शांततेत निषेध नोंदविणे अपेक्षित असताना काही उत्साही तरुणांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करून शांततेत होत असलेल्या बंदला गाल बोट लावले आहे.


परंतु आता पोलिसांनी निरपराध जनतेची धरपकड सुरू केली आहे. ती अन्यायकारक आहे. ज्यांनी गुन्हा केला असेल त्यावर कार्यवाही करणेस कुणाचाही आक्षेप असणार नाही. परंतु निरपराध जनतेला कोंबिंग ऑपरेशन करूण आपण एक प्रकारे अन्याय व अत्याचार करत आहात. म्हणून सर्व आरोपी आयडेंटिफाय होत नाही. तोपर्यंत कोंबिंग ऑपरेशन थांबवावे, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.


निवेदन देण्यासाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने, महाराष्ट्र राज्य महासचिव सतीश  बोरुडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नंदू शिंदे, राहुरी तालुकाध्यक्ष सतीश भांड त्याच प्रमाणे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमातीचे राहुरी तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, ॲड. भाऊसाहेब पवार, राज्य प्रवक्ते निलेश मच्छिंद्र जगधने, दीपक लक्ष्मण आव्हाड, सुनील बोरुडे, राज्य कार्यकारणी सदस्य कामेश बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश रमेश जगधने, राहुरी शहराध्यक्ष विलास बन्सी जगधने, वाहतूक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आढागळे, राहुरी तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश बोरुडे, राहुरी तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय जोगदंड, राहुरी तालुका सचिव राहुल वैरागर, नगर तालुकाध्यक्ष नवनाथ जाधव व राहुरी शहरातील हिंदू ग्रुपचे हेमंत पवार, मयूर खैरे, प्रज्वल ढोरे, अतुल गायकवाड, हेमंत पवार, सुनील उमाप, बाबुराव मकासरे व पंकज नारद, मनोज जगधने, पत्रकार चंद्रकांत जगधने व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.