चांदवडला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व महिला स्वाभिमानी समितीच्या वतीने परभणी घटनेतील आरोपीस फाशी देण्याची पोलीस आधिका:यांना निवेदनाद्वारे मागणी
चांदवड - अन्याय अत्याचार निर्मुलन समिती आणि महिला स्वाभिमानी समिती चांदवडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडणा-या देशद्रोही संविधानद्रोही आरोपीस फाशी देण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महिला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती आणि महिला स्वाभिमानी समिती चांदवडतर्फे निवेदन देत आहेत की, परभणीत संविधानाच्या प्रतिकृती तोडणा-या देशद्रोही संविधानद्रोही आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी. दलित समाजातील दलित बांधव कार्यकर्ते तसेच महिला व भगिनी यांना घरात घुसून जबरदस्त पद्धतीने मारहाण करून अमानुष असे कृत्य केले आहे. तसेच नेहमीच दलित बौध्द समाजातील तरूणांना महिलांना जाणीवपूर्वक लक्ष बनवून, अमानुषपणे मारहाण करणा-या कर्मचा-यांना निलंबित करावे. वारंवार दलित बौध्द समाजावर होणारे विविध अन्याय अत्याचार त्वरीत थांबवावे. अन्यायकत्यार्ंना आणि सदर घटनेच्या पाठीमागे असणा-या मास्टरमांइंड आरोपींना कठोर शासन व्हावे. अन्यथा महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आणि महिला स्वाभिमानी समिती चांदवडतर्फे न्यायासाठी तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल. आणि होणा-या परिणामास पक्षपाती, जातीवादी हिंसाचारी मनुवादी हुकूमशाहीवादी अन्यायकर्ते पोलीस प्रशासन जबाबदार राहिल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर मायाताई निरभवणे, अजय बनकर, सिध्दार्थ निकम, संकेत शेजवळ, अदित्य वाघ, रुपाली निकम, शबाना तांबोळी, सुनीता निरभवणे, आशा निकम, ज्योती निकम, बेबी बनकर, अंजली बनकर, भीमा जाधव,रमा बनकर, नाना बनकर, आदिसह महिला व पुरुषाच्या सह्या आहेत
